सुश्री विजया देव
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी की वर्षा ऋतु के आगमन पर एक भावप्रवण मराठी कविता।)
☆ पावसाच्या कविता ☆
या धरेच्या रांजणात बरसतो
पाऊस हा
जीवनाचा अर्थ काही सांगतो
पाऊस हा
मित्र हा क्रुषिवलांचा करी क्रुपा त्यांचेवरी
शेत हिरवीगार कराेनी सुखवितो
पाऊस हा
काेरड्या झाल्या मनाच्या भावना
संवेदना
प्रेमवर्षावात तेव्हा भिजवतो
पाऊस हा
वाट हिरवी चालताना मातीला
येई सुवास
काय अत्तराचे सुगंध शिंपतो
पाऊस हा
विरह आणि मिलनाचे हा धडे देतो कशाला
प्रेमिकाना जागवितो जागतो
पाऊस हा
जाण याला संगिताची हा असे कां
गायक
रिमझीमणारी गझल गातो
रिझवतो पाऊस हा
© विजया देव, पुणे