सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरली  दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सरली आज दिवाळी,

 जपू मनी आनंदाचे क्षण!

प्रत्येक दिवाळीची ,

 मनी असे वेगळी आठवण!

 

वसुबारस ते भाऊबीज,

 दिवस असती प्रकाशाचे !

तोच प्रकाश मनात राहो,

 दिवे उजळीत अंतरीचे !

 

 स्नेहभाव वाढीस लागे ,

 उणी दुणी विरघळून जाती!

दीपावलीच्या आनंदात ,

 झरती स्नेहाच्या बरसाती!

 

रेखते अंगणी रांगोळी,

 ठिपक्यांची अन् नक्षीची!

तशी राखावी सर्वांची अंतरे,

 रेखीव, सुंदर नात्यांची !

 

असेच राहो मन आनंदी,

 निमित्त कशाला दिवाळीचे?

प्रार्थना करू ईश्वराची ,

 निरंतर राहो सौख्य मनाचे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments