कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 151 – विजय साहित्य
☆ धुंद झाले मन माझे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
धुंद झाले मन माझे
शब्द रंगी रंगताना
आठवांचा मोतीहार
काळजात गुंफताना…….॥१॥
धुंद झाले मन माझे
तुझें मन वाचताना
प्रेमप्रिती राग लोभ
अंतरंगी नाचताना……..॥२॥
धुंद झाले मन माझे
हात हातात घेताना
भेट हळव्या क्षणांची
प्रेम पाखरू होताना……..॥३॥
धुंद झाले मन माझे
तुझ्या मनी नांदताना
सुख दुःख समाधान
अंतरात रांगताना……….॥४॥
धुंद झाले मन माझे
तुला माझी म्हणताना
भावरंग अंगकांती
काव्यरंगी माळताना……॥५॥
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈