श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ छान सुंदर सखी – २०२३… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
१. एखादं अतिशय कष्टाचं काम मी आजच पूर्ण करीन अशी खुळी जिद्द कशासाठी, जेव्हा ते काम उद्या दुसरा कोणी तरी करणार आहे !!
२. आपले कष्ट आणि मेहेनत दुसर्या कोणाला ठार मारणार नाहीत हे नक्की. पण उगीच चान्स् कशाला घ्या !!!
३. आपल्या शेजार्यावर खूप प्रेम करा. पण पकडले जाणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्या !!
४. ऑफिसमध्ये आरडाओरड करू नका. झोपलेल्यांची झोप डिस्टर्ब करू नका !!!
५. ग्रंथ अतिशय पवित्र असतात. त्यांना स्पर्श करून विटाळू नका !!
६. प्राणी आणि पक्षी यांच्यावर प्रेम करा. ते खूपच टेस्टी असतात !!
७. फळे, सॅलड्स अतिशय पौष्टिक असतात. ती आजारी रुग्णांसाठी राहू द्या. तुम्हाला इतर बरंच काही खाण्यासारखं आहे !!!
८. आयुष्यात सुख-आनंद म्हणजेच सर्वस्व या भ्रमात राहू नका. लग्न करा !!!
संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈