सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
मैत्रिणी हा श्वास असतो ,
मैत्रिणी हा ध्यास असतो
एखादी चंचल असते ,
तर एखादी शांत असते ,एखादी बोलकी तर एखादी अबोल
एखादीचं हास्य स्मित असतं तर एखादीचं हास्य खळखळून असतं
एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Outfit
एकत्रित जेवायला जातील ,पण घरातील सगळ्यांचं खाण्याचं करून निघतील .
सगळ्याच एकमेकीस सांगतील, “आज मी निवांत ताव मारणार आहे” ,
पण गप्पाटप्पांच्या नादात थोडेच खातील
कोणी धैर्यवान असतात तर कोणी भागूबाई असतात
कोणी नोकरीत,कोणी व्यावसायिक.
कोणी छान गृहिणी ,
कोणी तानसेन
तर कोणी कानसेन.
आवड प्रत्येकाची वेगवेगळी
आनंद घेतात क्षणभर
अन दुःख विसरतात मणभर
जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची
कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची
संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈