श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ आळस हा शोधाचा पिता… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
मी फक्त एक उदाहरण देणार आहे.कारण मोठी पोस्ट वाचण्याचा लोक आळस करतात.
मानवाला कच्चे अन्न खाण्याचा ( शक्तिनिशी तोडण्याचा आणि तासनतास चावण्याचा ) आळस आला, म्हणून चूल आली.
चूल पेटवण्याचा आळस, म्हणून त्याने स्टोव्ह आणला.
सतत रॉकेल भरण्याचा आळस,म्हणून गॅस आणला.
सिलेंडर संपल्यावर नवीन आणा.जुना काढा . नवीन लावा.या कामाचा आळस आला म्हणून नळीने गॅस आणला.
गॅसवर पदार्थ गरम होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा आळस येतो, म्हणून ओव्हन आला.
आता सगळ्याच सोयी सुविधांचा वापर करण्याचा आळस आला, म्हणून तो निघाला नाविन्याच्या शोधात.
तो आता पांचशे रुपयाचे पेट्रोल आणि चार तास खर्च करुन चुलीवरचे जेवण जेवायला घरापासून वीस किलोमीटर दूर जातो.दोन हजार रुपये बील पे करुन घरी परत येतो.
सुरुवातीलाच चूल वापरायचा आळस केला नसता तर आज त्याला तिन्ही त्रिकाळ चुलीवरचे जेवण, चुलीवरचा चहा,चुलीवरची मिसळ मिळाली असती.
मला टाईप करण्याचा आळस आला आहे,नाहीतर मी अशाच अनेक विषयावर लिहिले असते.
कसे लिहिले आहे हे सांगण्याचा आळस मात्र करू नका.
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com