कवितेचा उत्सव
☆ स्वप्नं सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
– स्वप्ने इवली इवली
– बाळमुठी सामावली….
– स्पर्श होता माऊलीचा
– खुले ओठांची पाकळी…
– तारुण्याच्या लाटेवर
– स्वप्नांचा झुलता पूल….
– पंखांची जाणीव होता
– पडे आभाळाची भूल….
– ज्येष्ठपण येता येता
– स्वप्नांनी ओंजळ भरली…
– सत्याला सामोर जाता
– जाग पापण्यांना आली….
– स्वप्न॔ हिंदोला झुलता
– झुले संगे माझे मनं…
– अंधारल्या दुनियेत
– एक दीप मी लावीन….
– थकलेल्या पावलांच्या
– उरी असे एक भाव….
– क्षितिजाच्या वाटेवरी
– भेटे मज ‘ स्वप्नंगांव ‘
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈