श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ उनाड वारा… ☆ श्रीशैल चौगुले ☆
उनाड वारा
भोवती मनाच्या
गोंगावतोच
स्मृतीत कुणाच्या.
कोवळी उन्हे
काळजातली
ऊलगडतो
भावना ऋणांच्या.
आभाळ प्रेम
हे आयुष्यातले
भृंगर साद
फुले जीवनाच्या.
उनाड वारा
अवचित ऋतू
मावळ सांज
खूणा यौवनाच्या.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈