श्री राहूल लाळे
कवितेचा उत्सव
☆ प्रपोज… 🌹 ☆ श्री राहूल लाळे ☆
(८ फेब्रुवारीला झालेल्या प्रपोज डे निमित्त…)
प्रपोज करूया आज आपण
आपल्याच जुन्या नव्या नात्यांना
प्रपोज करूया आज आपण
पुन्हा आपल्या जीवलग मित्रांना
प्रपोज करूया आज आपण
विश्वास आणि श्रद्धेला
प्रपोज करूया आज आपण
धैर्य आणि लढाऊ वृत्तीला
प्रपोज करूया आज आपण
जिद्द-निष्ठा आणि स्वाभिमानाला
प्रपोज करूया आज आपण
आपल्या सच्चेपणाला आणि विनयशील वृत्तीला
प्रपोज करूया आज आपण
सेवाभावी वृत्तीला आणि दातृत्वाला
प्रपोज करूया आज आपण
आपल्यातल्या माणुसकीला व देवत्वाला
प्रपोज करूया आज आपण
पुन्हा आपल्या जीवनसाथीला
प्रपोज करूया आज आपण
आपल्यातल्याच आपल्याला
चला तर मग !!!
© श्री राहुल लाळे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈