श्री विनायक कुलकर्णी
अल्प परिचय
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सहभाग 4 फेब्रुवारी 1996 आळंदी नंतर 4 फेब्रु. 2023…
वृत्तबद्ध काव्य रचना करण्याची विशेष आवड.’ऋतूपर्ण ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
सध्या सांगली येथे इंग्लिश क्लासेस घेतात.
कवितेचा उत्सव
ऋतूनाद…
श्री विनायक कुलकर्णी
(भृंगावर्तनी,समजाती)
मात्रावृत्त..६-६-६-६=२४
गड गड गड मेघ कसे अवचित हे गडगडती
थड थड थड या चपला नभांगणी थडथडती
सर सर सर जलधारा धरतीवर कोसळती
झर झर झर तोय कसे पर्णातून ओघळती
खळ खळ खळ धवल धवल पाण्याचे पाट किती
सळ सळ सळ समिराच्या गाण्याचे थाट किती
चम चम चम अधुन मधुन रविराजा चमचमतो
घम घम घम गंध नवा मातीचा घमघमतो
ढम ढम ढम ढोल तिथे आकाशी ढमढमतो
छम छम छम ताल धरत मयुर इथे छमछमतो
© विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈