सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 170
☆ मिळे सन्मान शब्दांना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
मला सांगायचे आहे जरासे
इथे थांबायचे आहे जरासे
☆
किती दुष्काळ सोसावा धरेने
अता बरसायचे आहे जरासे
☆
नदीला पूर आल्याचे कळाले
तिला उसळायचे आहे जरासे
☆
कधी बेधुंद जगताना मलाही
जगा विसरायचे आहे जरासे
☆
मिळे सन्मान शब्दांना स्वतःच्या
तिथे मिरवायचे आहे जरासे
☆
मला या वेढती लाटा सुनामी
मरण टाळायचे आहे जरासे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈