सुश्री आरुशी अद्वैत
(आषाढ़ी एकादशी पर आज प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी द्वारा रचित अभंग )
☆अभंग ☆
ताल धरी टाळ,
ठेक्यातली माई,
माऊली ही आई,
निर्विकार..।
नाम जप सजे,
काया वाचा वसे,
अंतरात भासे,
सदोदित… ।
भक्त गण नाचे,
श्रद्धा डोई चाले,
अखंड उमले,
वृंदावनी… ।
एकतारी संगे,
निरपेक्ष वाटे,
नयनात दाटे,
परमार्थ… ।
प्रपंचाची आस,
करी कर्मकांडे,
मोक्षासाठी भांडे,
पाप पुण्य … ।
दिलासा हा हृदयी,
काया वाचा बोले,
समर्पण केले,
पांडुरंगी… ।
© आरुशी अद्वैत