श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 145 – शब्दभ्रम ☆
☆
नको नुसते शब्दभ्रम करा थोडे तरी काम।
जनतेच जीवन वर किती कराल आराम।।।धृ।।
☆
आश्वासनांची खैरात कशी वारेमाप लुटता।
निवडुणका येता सारे हात जोडत फिरता
कधी बोलून गुंडाळता कधी देता थोडा दाम ।।
☆
योजनांची गमं त सारी कागदावरच चालते।
भोळीभाबडी जनता फक्त फॉर्म भरून दमते।
सरते शेवटी लावता कसा तुम्ही चालनचा लगाम।।
☆
सत्ता बदलली पार्टी बदली ,पण दलाली तशीच राहिली।
नेते बदलले कधी खांदे पण लाचारी तिच राहिली।
टाळूवरचे लोणी खाताना, यांना फुटेल कसा घाम।
☆
जात वापरली रंग वापरला ,यांनी देव सुद्धा वापरले।
इतिहासातल्या उणिवानी,त्यांचे वंशज दोषी ठरले।
माजवून समाजात दुफळी, खुशाल करतात आराम ।
☆
प्रत्येक वेळी नवीन युक्ती कशी नेहमीच करते काम ।
सुशिक्षितही म्हणतो लेका आपलं नव्हेच हे काम ।
म्हणूनच सुटलेत का हो सारेच कसे बेलगाम।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈