श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “एक वेगळं ज्ञान ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
कामानिमित्त लोहाराकडे गेलो असता,
काम झालं, आणि त्याला सहज विचारलं की
“बाबा, ऐरण व हातोडी ही तुमची साधने ! तर किती वर्ष झाली हातोडी व ऐरणीला?”
*
लोहार म्हणाला, “हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण कायम टिकून आहे”
मी विचारलं, “असं का ?”
त्यावर लोहाराने जे उत्तर दिले ते जणू मला जगण्याचा अर्थच सांगून गेले.
लोहार म्हणाला—
“जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात !”
*
मनोमन त्याला राम राम करून निघालो —
— एक वेगळं ज्ञान घेऊन !
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈