सौ. जयश्री अनिल पाटील
चित्रकाव्य
– चिमुकला बाळ – ☆ सौ. जयश्री अनिल पाटील ☆
☆
बाळ थकून झोपला
नाही कशाचेच भान
पोटासाठी धडपड
करी असून लहान
☆
चिमुकला जीव त्याचा
जाई दमून भागून
खस्ता सतत खाऊन
गेला अलगद झोपून
☆
शुभ्र फुलांचे गजरे
माळा विकता विकता
हतबल होई कधी
रोज सतावते चिंता
☆
कष्ट करता करता
जीव येई मेटाकुटी
रस्त्यावर मग त्याची
पडे कधी वळकटी
☆
चित्र साभार – सौ. जयश्री पाटील
© सौ. अनिल जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈