श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ग्रीष्म युग… ☆ श्रीशैल चौगुले ☆
सुखी मना भाव पुन्हा
तोच जुना ग्रीष्मात.
दुःख तसे उन्ह तप्त
झळ युक्त अस्वस्थ.
याद गीत गुप्त प्रीत
भेट नीत काळजा.
सत्य बात घडी घात
तुझी साथ मरण.
एक मात्र जीव सल
जणू दल जीवंत.
गत् जन्म ऋतू साक्ष
तो गवाक्ष आशाळ.
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈