प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
कवितेचा उत्सव
☆ वंदन विश्वभीमाच्या चरणी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆
१ . …
भीम माझा महामेरू प्रबोधनाचा,
त्राता पददलितांचा,
विसावा अवघ्या मानवजातीचा ;
सर्वहारा माणसाचा श्वास
मानवतेचा विश्वास
नवनिर्मितीचा ध्यास;
वंदन विश्वभीमाच्या चरणी
२. …
दिले तुम्ही महासंविधान –
स्वातंत्र्याला आकार दिला,
गाडले अमानुष जातीयतेला ,
मतपेटीतून फुलली रक्तहीन क्रांती ,
बसली भारत भूवर शांती ,
दिले तुम्ही महासंविधान
समतेच्या शिंपल्यात
नवयानाचा मोती !
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈