सौ राधिका भांडारकर
इंद्रधनुष्य
☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
युवराज शंभुने कविता लिहिली
प्राणप्रिय पत्नीसाठी शब्द स्फुरले
श्री सखी राज्ञी जयति
ओळीतून या त्यांचे भार्या प्रेम प्रकटले १
स्वराज्याच्या धगधगत्या निखाऱ्याला
समजून घेत जपले आपल्या पदरात
कणखर, हळवी ,प्रेमळ सोशिक
कधी न डगमगली वादांच्या प्रवाहात ..२
पत्नीच असते लक्ष्मी, सखी, राणी
भावना पतीची आहे गौरवा समान
या शब्दांच्या अर्थांना जाणले येसुने
सदा मानले स्वराज्याचे कर्तव्य महान ..३
आज वळून पाहता इतिहासाकडे
काळाने दिल्या किती रणरागिणी
मूर्तीमंत जणू लखलखत्या तलवारी
दुःखात हसल्या या शूर विरहिणी…४
झळकले चार शब्द राजमुद्रेवर
धन्य तो शिवरायांचा छावा
ज्याने केला जय जयकार स्त्रीचा
शब्द भावनेतून केवळ कसा वर्णवा ?..५
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈