सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आरती श्रीशंकराची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(साकव्य विकास मंच आयोजित अभंग लेखन स्पर्धेत  सर्वोउत्कृष्ट क्रमांक प्राप्त रचना)

     🙏 || आरती श्रीशंकराची || 🙏

जय देव जय देव शिव शंभो त्रिपुरारी

भवतारक देवा हे त्रिनेत्रधारी ||

जय देव जय देव || ध्रु ||

त्रिशूळ डमरू शोभे सर्पमाळ गळा

रुद्राक्षधारी हा शिवशंकर भोळा

भोलेनाथासी भक्तांचा लळा

अभयदान देई त्याचा तिसरा डोळा ||

 जयदेव जयदेव || १ ||

कैलासाधिपती गिरिजावर देवा

कृपा करावी तुझी नित्य घडो सेवा

शिव शिव स्मरता भुक्ति मुक्तिचा ठेवा

नाम जपो वैखरी ही तुझे सदाशिवा ||

जय देव जय देव || २ ||

लयतत्त्व स्वामी तू विश्व नियंता

तुझ्या कृपाप्रसादे लाभो शांतता

बुद्धी दे शक्ति दे देई तुष्टता

श्रीविश्वनाथा देई सौख्य या जगता ||

जय देव जय देव || ३ ||

प्राशुनी हलाहलासी रक्षिली अवनी

तुज सम नाही त्राता अवघ्या त्रिभुवनी

गौरीहरा तव कृपेने आश्वस्थ हो धरणी

विश्वदयाळा ज्योत्स्ना लीन तुझ्या चरणी || ४ ||

जय देव जय देव शिव शंभो त्रिपुरारी

भवतारक देवा हे त्रिनेत्रदारी ||

जय देव जय देव ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments