कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 172 – विजय साहित्य
☆ माझा हवेली तालुका ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
पुणे जिल्ह्यातील एक
शोभे तालुका हवेली
मुळा मुठा नदी सवे
ख्याती याची अलबेली….! १
आर्वी उरुळी कांचन
गाव कल्याण कवडी
फुरसुंगी नी थेऊर
खेड शिवापूर गढी….! २
चिंचवड नी पिंपरी
सोनापूर, तुळापुर
पुणे शहराचा भाग
औद्योगिक त्याचा नुर…! ३
पहा मांजरी, मांडवी
शांत, रम्य,परीसर
छोट्या मोठ्या ,वाडी वस्त्या
हवेलीत मनोहर…..! ४
पीक बाजरी तांदूळ
गहू,ज्वारी हरभरा
साखरेचा कारखाना
समृद्धीची परंपरा….! ५
माझा हवेली तालुका
शेती माती जोपासतो
भक्ती शक्ती कलागुण
नाविन्याने भारावतो….! ६
औद्योगिक वसाहती
हवेलीची आहे शान
स्थलांतर करूनिया
खगगण घेती मान….! ७
स्वराज्याची उभारणी
सह्याद्रीच्या मुशीतून
साकारले शोर्यतेज
हवेलीच्या कुशीतून…! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈