सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
इंद्रधनुष्य
☆ “श्री कलमपुडी राव…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
कलमपुडी राव, वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांना सोबत मुलीकडे रहायला गेले. तिथे वयाच्या ६२ व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्र विषयाचे प्राध्यापक तर वयाच्या ७० व्या वर्षी पेनसुलव्हाणीया विद्यापीठात विभाग प्रमुख. वयाच्या ७५ व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व. वयाच्या ८२ व्या वर्षी National Medal For Science हा व्हाईट हाऊस चा सन्मान.
आज वयाच्या १०२ व्या वर्षी संख्या शास्र (Statistics) विषयातील नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांना.
भारतात सरकारने त्यांना पदम भूषण (१९६८) आणि पदम विभूषण (२००१) देऊन अगोदरच गौरविले आहे.
राव म्हणतात: “ भारतात सेवानिवृत्त झाल्यावर कोणी विचारीत नाही. अगदी शिपाई सुध्दा पदावर असेल तर नमस्कार करील. सहकारी देखील सत्तेचा आदर करतात, प्रज्ञेचा (scholarship) नाही.”
वयाच्या १०२ व्या वर्षी, उत्तम शरीर प्रकृती असताना नोबेल मिळणं हे बहुदा पहिलं उदाहरण असावे.
मानवी प्रज्ञेची दखल घ्यावी अशी घटना !
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈