सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “लाटा” ☆ स्वैरअनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांच्या इंग्रजी कवितेचा स्वैरअनुवाद.)
अलाई अलाई, अलाई अलाई, अलाई अलाई रे …
लाट जणू लाट .. ही तर लाट आहे रे ….
धावे मन शोध घेत… आनंदाचा रे ….
आयुष्य नेमके कसे .. परि ठावे नसे रे ….
हैय्या हो …. हैय्या हो ……
इच्छा जन्मे मनी जणू इवली मासोळी
भान तिचे सुटे नि आता केवढी वाढली ….
बघता बघता अन आता ती ‘व्हेल’च झाली…
मनोमनी आणि क्षणी मोहरूनी गेली ….
व्हेल हाती लागला.. पण हाव संपेना
अजून एक मासोळी हवी .. हट्ट थांबेना ….
इच्छांच्या लाटांवर मन स्वैर उसळे …
आणि नाव आकांक्षांची.. सदा तिथे डुले ….
लाटा उफ़ाळत्या तशी काळजाची धडधड …
आणखी पुढे जाण्यासाठी.. जीवाची तडफड ….
समुद्राची ती वरवरची सळसळ… लाटा वरवर रे …
आणि ‘ मुक्त ‘ मासोळ्या त्या.. खोलखोल फिरती रे ….
इच्छा म्हणजे मनातले रे .. वरवरचे तरंग …
खोल आत सळसळती …आनंद तरंग ….
एवढे तरी समजून घे … माणसा मनात रे …
तुझ्यातच दडलाय परमानंद .. नकळत जाणवेल रे ….
मग सगळ्या लाटा आनंदमयी .. तुलाच उमजेल रे …
तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे ….
तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे ….
हैय्या हो …. हैय्या हो ……..
सद्गुरू श्री जग्गी वासुदेव
स्वैरअनुवाद: सुश्री मंजुषा सुनीत मुळे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈