श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नाते नव्याने… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
साद घालता मेघांना ,
हाकांचा पाउस आला.
थेंब जपला डोळ्याचा,
अनाहूत ओघळला .
मोर नाचले तमात,
कसे उस्फूर्त जोमात .
चमकल्या साैदामिनी,
मेघ जमल्या नभात.
रान बहकले थोडे,
वृक्ष चिंबचिंब झाले.
थेंबथेंब अमृताने,
विश्व अवघे नहाले.
धरा आकाशाचे जसे,
आज अद्वैत घडले.
क्षितिजासी अघटित ,
नाते नव्याने जडले.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈