सुश्री तृप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ लढा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
जो तो सज्ज आहे येथे घनघोर लढण्याकरता
पण लढायचे कशासाठी याचे भान सुटले आहे
हरेक लढाई नसते केवळ सत्य-असत्यामधली
गैरसमजाची चाल येथे पट उधळत आहे
आपण सारे आहोत येथले घडीचेच प्रवासी
स्पर्धेच्या ईर्षेने पांथस्थ आपली वाट चुकतो आहे
आधी अन् अंत यानंतर नक्की काय बाकी उरते
काळाने हे खास गुपित त्याच्या पोटी दडवले आहे
खेळ किती हा युगायुगांचा माहीत नाही कोणा
जो तो आपुल्या शाश्वततेचा दावा करतो आहे
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈