सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संस्कार… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

उपेक्षिसी माणसा का

काळ्या तुझिया आईला ?

आजवरी वाढविले

अरे लेकरा तुजला —

 

एक बीज तू पेरता

धान्य देते ओंजळीने

संस्कार ते दातृत्वाचे

विसरला तू कशाने —

 

शिक्षणाने प्रगतीची

उघडली रे कवाडे

परी विकूनी मजला

जाशी दूर कुणीकडे? —

 

शेतीतच प्रगतीचा

ओघ अरे वाहू देत

नव्या जोमाने कर तू

बाळा कष्टाची शिकस्त — 

 

घाम गाळता शेतीत

 मोती घर्माचे बनती 

अरे बळीच्या रे पोरा

किती श्रमाची श्रीमंती ! —

  

संस्कारांना जपता तू

खरा माणूस होशील

जीवनाचा अर्थ सारा

खरा तुज गवसेल —

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments