महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 135
☆ अभंग – रंग भरे जीवनाला… ☆
केस तुझे हे मोकळे
उडतात भुरूभुरू
जैसे सुटले बघ ते
अचपळ शाम-वारू.!!
अचपळ शाम-वारू
घाल आवर तयाला
भोळा जीव माझा सखे
सखे तयात गुंतला.!!
सखे तयात गुंतला
हवा आधार मनाला
तुझ्या आधारे रंग
रंग भरे जीवनाला.!!
रंग भरे जीवनाला
हेचि पाहतो स्वप्नाला
छान बकुळ फुलांचा
देतो गजरा केसाला.!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈