श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ शाप… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
किती मनातल्या सांगू गोष्टी
जीवन हे पडेल अपूरे
काळजातले शब्द अनेक
कवितेचे ते स्वप्न अधूरे.
☆
ओठावरले रुळले गाणे
बकुळीच्या छायेत विरले
फक्त आठवणी वेचताना
कसे काय आयुष्य सरले.
☆
घन दाटलेल्या पावसात
लख्ख दिवस चमकतात
अजून माळावरल्या कुशीत
गुपित फुले ऊमलतात.
☆
अधिर होते मन ग्रीष्मात
पुन्हा भाव ते न येतील
उगी दूरच्या छटा पहाता
सुरकुतले तारे गातील.
☆
एकांकी मंजुळ, वाट जळा
पक्षी हरवले डोळ्यांमधे
हाक एकदा तीच येऊ दे
दव विरघळे साधेसुधे.
☆
काय लिहू सांग कविता
सांजही दैव बदलते
शपथ एक कथा होते
जन्म शाप नित्य सलते.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈