डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) – ऋचा ६ ते १०
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – अग्नि
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सव्विसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अग्नी देवतेला आवाहन केलेले असल्याने हे अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी अग्निदेवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
यच्चि॒द्धि शश्व॑ता॒ तना॑ दे॒वंदे॑वं॒ यजा॑महे । त्वे इद्धू॑यते ह॒विः ॥ ६ ॥
भिन्न देवता तरीही त्यांच्यासाठी एक हवी
अर्पण केला त्या सर्वांना भक्तीने हा हवी
तुम्हासाठी घेऊनी आलो प्रेमाने हा हवी
संतोषा पावावे आता स्वीकारुनिया हवी ||६||
☆
प्रि॒यो नो॑ अस्तु वि॒श्पति॒र्होता॑ म॒न्द्रो वरे॑ण्यः । प्रि॒याः स्व॒ग्नयो॑ व॒यम् ॥ ७ ॥
शुभदायी पंचाग्नीचे करितो प्रेमे पूजन
त्यांच्याठायी लुब्ध जाहले भक्ती भरले मन
आम्हालाही प्रीती द्यावी हे अग्निदेवा
नृपती तू तर देवांना अमुचा हा हवि पोचवा ||७||
☆
स्व॒ग्नयो॒ हि वार्यं॑ दे॒वासो॑ दधि॒रे च॑ नः । स्व॒ग्नयो॑ मनामहे ॥ ८ ॥
शुभदायक अग्नीचे असती स्नेही थोर देव
सामर्थ्याने उभारले स्तुतिपात्राचे वैभव
हितकर्त्या अनलाचे भक्त आम्ही निस्सीम
सदैव त्याचे चिंतन करितो होउन निष्काम ||८||
☆
अथा॑ न उ॒भये॑षा॒ममृ॑त॒ मर्त्या॑नाम् । मि॒थः स॑न्तु॒ प्रश॑स्तयः ॥ ९ ॥
ऐका अमुची आर्त प्रार्थना अमर अशा देवा
होतृ ऋत्विज यांच्या मध्ये सुसंवाद ठेवा
होमकुंड हे जागृत केले पुण्यसंचयाला
समर्थ तुम्ही यज्ञाला संपन्न करायला ||९||
☆
विश्वे॑भिरग्ने अ॒ग्निभि॑रि॒मं य॒ज्ञमि॒दं वचः॑ । चनो॑ धाः सहसो यहो ॥ १० ॥
समस्त विश्वा सर्व ज्ञात तुमचे सामर्थ्य
यज्ञासाठी तुमची अर्चना सर्वार्थाने सार्थ
पंचाग्निसह येउनी अनला यज्ञा साक्ष करा
या यज्ञावर या स्त्रोत्रावर उदंड प्रेम करा ||१०||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 6-10
Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 6-10
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈