सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– सजा…–
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
पडत चालल्यात भेगा
रानात खोल खोल
पोटची पोरं जगवण्या
धरणी मागते ओल
☆
पोटात बीज सुकत चालले
वाट पाहून डोळे थकू लागले
येरे ना रे मेधा.. बरस अंगभर
मन माझेही कळवळू लागले
☆
जग पोशिंदा शेतकरी राजा
कष्टकरी हा भूपुत्र माझा
कष्टाला दे न्याय तयाच्या
कशास देशी ही क्रूर सजा —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈