सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ ॲनिमल फार्म… भाग-३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
कादंबरीचे सुरुवातच भविष्यकालीन सूचक अशा घटनातून केली आहे. मॅनोर फार्मचा मालक ‘जोन्स ‘ हा दारू ढोसून झोपतो. बाहेर टांगलेला दिवा जोर जोरात झोके घेत असतो. एक ,एक प्राणी हळूहळू मोकळे व्हायला लागतात. ओल्ड मेजर हा वयोवृद्ध डुक्कर (लेनिन) याला सर्वजण मान देत असतात. त्याला स्वप्न पडतं की ,सर्व प्राणी स्वतंत्र होऊन त्यांचीच शेती झाली आहे. तो सर्वांना एकत्र बोलावून आपले स्वप्न सांगतो. सर्वांना पटवून देतो की, हा माणूस तुम्हाला लुटतोय. कोंबड्यांची अंडी ,गाईचे दूध , मेंढ्यांची लोकर सगळं तो वापरतोय. Man is the only enemy we have. Man is the only creature, that consumes without producing. स्वप्न साकार करायचे म्हणून प्रेरणा देतो. सर्वांना उत्साह येतो. सर्व प्राणी फेर धरून गाणे म्हणतात. “beasts of england, beasts of Ireland. beasts of every land and clime. herken to my joyful things of the golden future time. “
प्राण्यांमध्ये प्रचंड उत्साह सळसळतो. आणि सर्वजण मिळून जोन्स (झारला) मॅनोर फॉर्म मधून हाकलून ,ते ताब्यात 1घेतात. ओल्ड मेजर चा अंत होतो. नेपोलियन, बॉक्सर आणि स्क्विलर हे तीन स्वतःला बुद्धिमान समजणारे डुक्कर, (बुद्धिमान बोल्शेविक फार्मचा ताबा घेऊन , मॅनोर फार्मचे नाव बदलून “ॲनिमल फार्म “असे नाव देतात. सर्वांच्या भल्यासाठी, असं सांगून सात तत्व ( कमांडमेंट ) तयार करून ,एका पाटीवर लिहिली जातात. ती रोज सर्वांनी वाचायची असे ठरते.
1 ). What ever goes upon two legs is an enemy.
2) what ever goes upon four legs or has wings,is a friend.
3) no animal shall wear clothes.
4) no animal shall sleep in bed.
5) no animal shall drink alcohol.
6)no animal shall kill any other animal.
7)all animals are equal.
हे वाचता येणारे फक्त बेंजामिन गाढव आणि म्युरिअल शेळी इतकेच होते. मार्च 1917 ला मोन्शेविक गटाने क्रांती केली़. नंतर लेनिन परतला. आणि त्याने बंड करून बोलशेविक क्रांती केली. सर्वसामान्य माणसे स्वातंत्र्याचे स्वप्न पहात होती. समानता आणि स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगणारा ,बॉक्सर घोडा अखंड कष्टाला तयार असतो. बेंजामिन गाढवही मूकपणे कष्टाला तयार असते. शेळ्या ,मेंढ्या ,छोटे छोटे कोंबड्या, बदकासारखे प्राणी आलेल्या सूचनांप्रमाणे शहानिशा न करता वागणारे नागरिक. लवकरच नेपोलियन आणि स्नो बॉल यांच्यामध्ये संघर्ष होतो. आणि दुसरी क्रांती होते. 26 ऑक्टोबर 1917. नेपोलियनने कुत्र्यांच्या पिलांना बाजूला ठेवून, शिकवून तयार केलेले असते. (गुप्त पोलीस पथक ) त्यांना स्नो बॉलच्या अंगावर सोडून त्याला हाकलून लावून ,सर्वांकष सत्तेवर येतो तो नेपोलियन. (स्टलिन).
हुकूमशाहीला सुरुवात होते. नेपोलियनची पैसा आणि सत्तेची हाव वाढायला लागली. प्रत्येक वाईट गोष्टींना स्लोबल कारणी भूत आणि चांगल्या गोष्टी नेपोलियन मुळे, असा विचार प्राण्यांच्या मनावर बिंबवला गेला. माँली घोडी चैनी होती. ती शहरात पळून गेली.
हळूहळू विंकर या माणसाच्या मध्यस्थीने ,दूध ,अंडी, लोकर, अगदी चारा सुद्धा बाहेर विकून, डुकरांसाठी चैनीच्या वस्तू यायला लागल्या. इतरांची उपासमार व्हायला लागली. काही प्राणी पुन्हा जोन्सकडे जाण्याचा विचार करायला लागले. त्यांना सरळ सरळ मारून टाकले. सगळ्यांच्या काबाडकष्टाने उभी केलेली पवनचक्की शेजारच्या मालकांनी त्यांची फसवणूक केल्याने त्याने उद्ध्वस्त करून केलेल्या गोळीबारात अनेक प्राणी मरून गेले. या सगळ्या गोष्टींना स्नो बॉलच कारणीभूत आहे, असे पसरवले गेले. प्रत्येक वेळी स्क्विलर जोन्सचा गुप्तहेर म्हणून काम करायचा. दूध, अंडी, सफरचंद डुकरे स्वतःसाठी बाजूला ठेवायला लागली. गाद्यांवर झोपायला लागली. दारू प्यायला लागली. मोजेस कावळा ढगांनी पलीकडच्या स्वर्गीय गप्पा सर्वांना ऐकवून , डुकरांकडून दारू मिळवायला लागला. प्राण्यांचं अन्न कमी झालं. हळूहळू करत सातही तत्त्वात बदल झाले.
1) four legs good. two legs better.
2) no animal shall drink excess.
अस करत प्रत्येक तत्व बदल करत करत शेवटी स्वार्थ साधून , सोयिस्करपणे all animals are equal,but some animals are more equal than other. पूर्वीच बिस्टस ऑफ इंग्लंड हे गाणं रद्द झालं. कोणी म्हटलं तर त्याला मृत्युदंड. नवीन गाणं सुरू झालं.
“Friends of fatherless, fountain of. Happiness —– – – – -like the sun in the sky., Comrade Nepoleon. झेंड्याचा रंगही बदलला. सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. अ पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.
अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला दवाखान्यात नेतो असं सांगून खोटं सांगून कसा याकडे पाठवलं जातं बेंजामिन गाढवाला सगळं कळत होतो पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला आणि त्याला वीर मरण आले असं स्केलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला
हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही. जी तात्विक मूल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात. त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो. येथे कादंबरीचा शेवट होतो.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈