कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये  किसान आत्महत्या क्यों करते हैं? इस विषय पर एक शोधपूर्ण आलेख “शेतकरी आत्महत्या का करतो?”)

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प  अकरावे # 11 ☆

 

☆ शेतकरी आत्महत्या का करतो? ☆

 

पावसावर अवलंबून  असणारी भारतातली शेती. भारतीय  अर्थ व्यवस्थेचा मूलाधार.  आणि हा  आधार भक्कम ठेवणारा शेतकरी म्हणजेच बळीराजा उत्पादन खर्च  आणि शेती उत्पादनाला योग्य प्रमाणात न मिळालेला बाजार भाव यामुळे  अत्यंत  अडचणीत आला आहे. नवीन पिढीला तंत्रज्ञान क्षेत्राचे आकर्षण  असल्याने या व्यवसायात नवी पिढीचे प्रमाण कमी झाले आहे.  येत्या काही वर्षांत शेती उत्पादन ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.  पिकवलेच नाही तर खाणार काय? हा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. शेतकरी अनेक कारणांमुळे  आत्महत्या करीत आहे.

शेतकरी  आत्महत्या करतात याचे मुख्य कारण म्हणजे सहज सुलभ मार्गाने येणारा पैसा बंद झाला की कींवा कर्जबाजारी पणा वाढला की स्वार्थी,  आणि आत्मकेंद्रीत व्यक्ती  आत्महत्या करताना दिसतात.  संयम, चिकाटी, धैर्य, सातत्य आणि सहनशीलता या गुणांच्या  अभावाने शेतकरी माणूस लवकर खचतो. मनुष्य जोवर  इतरांना दोषी ठरवून जगत असतो तोपर्यंत तो अनेक प्रसंगाना तोंड देत जीवन संघर्ष करू शकतो. पण स्वतःच्या चुका मान्य करण्याची वेळ आली तो हातपाय गाळून निष्क्रिय होऊन स्वतःहून परीस्थिती नियंत्रणाबाहेर नेतो आणि आत्महत्येचा पर्याय स्विकारतो.

शेतकऱ्याला  आत्महत्या का करावी वाटते या प्रकरणी सरकार त्याच्या परीने प्रयत्न करेलच. पण मला वाटते कौटुंबिक पातळीवर प्रत्येक घराघरातून हा विषय चर्चेला आला पाहिजे. या समस्येवर समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे.  संयम, चिकाटी, दुर्दम्य आशावाद, यांनी मोठमोठय़ा संकटांवर मात केली आहे.  आत्महत्या होऊ नये म्हणून कुटुंबात संवाद साधला जाण  अत्यंत गरजेचे आहे.

शेती प्रधान उद्योग धंद्यात सुजलाम सुफलाम  असणाऱ्या या भारत देशातील शेतकऱ्याला  आपण बळीराजा म्हणून मानाचे स्थान दिले आहे.  असे असताना देखील त्याच्या गळी गळफास येतो आहे ही बाब चिंताजनक आहे.  जोडधंदा,  आणि शेती पुरक व्यवसाय यामध्ये शासनाने दिलेल्या सोयी सुविधांचा वापर करून उदरनिर्वाह करीत रहाणे हा  पर्याय  आत्महत्येस बगल देऊ शकतो.  गोपालन,कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, यासारखे शेती पुरक व्यवसाय ग्रामीण भागात कार्यरत ठेवणे आवश्यक झाले आहे.

आपण स्वतःसाठी,  कुटुंबासाठी आणि  समाजासाठी  आपली दायित्व पूर्ण करीत जगायचे आहे.  आपण  एकटे नाही.  आपल्यावर अनेकांची जबाबदारी आहे ती नाकारून चालणार नाही हा विश्वास  अशा माणसांमधे  उत्पन्न झाला तर  आत्महत्या कमी होतील.  स्वतःला संपवणे हा  उपाय नसून गंभीर गुन्हा आहे ही जाणीव शेतकरी वर्गाला करून देणे  हे समाज प्रबोधन गरजेचे झाले आहे.

समाज पारावरून या विषयावर चर्चा करताना लहान तोंडी मोठा घास घेतला  असेन कदाचित पण माणूस म्हणून जगताना  आपल्याला पोसणारा शेतात  अन्न धान्य पिकवणारा हा बळी राजा हकनाक बळी जाऊ नये  असे मनापासून वाटते. आत्महत्या थांबतील तरच विकसन आणि प्रगतीची दारे आपल्या साठी खुली होतील. संवाद  आणि विचार  अत्यंत गरजेचा आहे.  जय हिंद.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments