सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 194 ?

☆ कस्तुरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

यंदाच्या मोसमात

बहरलाच भरघोस,

मोगरा माझ्यासाठी !

 

त्याची कंच हिरवाई

डोळ्यात भरून राहिलेली

आणि शुभ्र दरवळ

आत खोलवर

प्राणापर्यंत !

 

मग मी ही

चंदनासारख्या

उगाळत राहिले

त्या ऋतुबहराच्या आठवणी….

 

काही घाव

दुख-या जखमा

घेतल्या लिंपून

त्या शीतल सुगंधाने !

 

आता मोगरा

फुललाय अंगोपांगी

आणि अवघा देह

कस्तुरी झालाय!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments