सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– हवे ते मिळे प्रयत्नांती… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
विशाल अंबर माथ्यावरती
सागर पाणी सारे भवती
उगवून आले तरीही पण ते
प्रचंड या कातळावरती ….
☆
तिथे बीजाला रुजण्यासाठी
कशी मिळाली असेल माती
त्या मातीतून पोषणतत्वे
मिळाली तया कशी न किती? …
☆
झाड उभे हे खडकावरती
दगडासम भक्कमशी छाती
मान उभारून जगा सांगते
हवे ते मिळे प्रयत्नांती …
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈