सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 196
☆ गझल – प्रीती… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
त्या कालच्या क्षणांचा केला विचार आहे
सांजावता असे का मन बेकरार आहे
☆
अव्यक्त तू जरासा,मी ही मुकीच होते
वाचाळ वेदनाही आता फरार आहे
☆
माझे मला कळेना घडले असेच काही
तो जेवढा मिळाला तितकाच फार आहे
☆
नावे नकाच देऊ नात्यास त्या कधीही
होईल या पुढे जे त्याला तयार आहे
☆
गेले म्हणून कोणी “वर्षाव ‘तो’ पडो ही”
लाभे क्षणैक प्रीती ती बेसुमार आहे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈