कवितेचा उत्सव
☆ युगायुगांचे नाते…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
युगायुगांचे नाते…
आले चंद्रा तुज भेटाया आज तुझ्या अंगणी
अब्ज युगांनी भेटे तुला आज तुझी ही भगिनी
तू मामा , तूच चंद्रमा , तूच रूपाची खणी
अनेक रूपे तुझी पाहती जन सारे भूवनी
ज्ञानामधुनी विज्ञानाची मारुन उंच भरारी
आज बांधते राखी तुजला नव्या युगाची खरी
वळण लागले आज वेगळे सत्य असे हे जरी
भावबंध हे नात्यामधले जपू असे अंतरी
कास धरुनिया विज्ञानाची सत्य आता शोधणे
साहित्यातील स्थान तुझे कधीही नाही ढळणे
ब्रह्मांडातील आपण जरी दूर दूर राहणे
युगायुगांचे नाते जपूया, हेच एक मागणे.
☆
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈