श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ मी म्हणाले… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी म्हणाले , ये
लवकर ये
रिमझिमत ये
फूलकोषात झिरपत ये
नदी-नाले भरत ये
बीजातला अंकुर जागवत ये
नवे जीवन घडवत ये
सृष्टी सुजलाम् सुफलाम् करत ये
तू आलास
लगेचच आलास
दौडत आलास. झोडत आलास.
फूल-पाने मोडत-तोडत
नदी-नाल्यांना पूर आणत
बीजातला अंकुर कुजवत
अवघे जीवन नष्ट करत
सृष्टीमध्ये विनाश घडवत
तू आलास
असा रे कसा आलास ?
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈