डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ रक्षाबंधन ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
रक्षणाचे बंधन परंपरेने भावाला बहिणीचे जरी
अडचणीत आईसम संभाळते बहिणच खरी
☆
राखी एक निमित्त,नातं बांधून ठेवण्यासाठी
भाऊ असतोच समर्थ तिला जपण्यासाठी
☆
रक्षणा सोबत प्रोत्साहन हवे उच्च शिक्षणास
संपत्तीत वाटा देताना समाधान वाटावे मनास
☆
नात्यातले तयार असावेत एकमेकांच्या रक्षणास
भाऊ पाहिजे असा नसावा कुणाचाच अट्टाहास
☆
बहीण ही बहिणीला हाक देते संकटकाळी
सोबत करतात एकमेकी अडचणीच्या वेळी
☆
रक्षेचे बंध हे मनातून जिव्हाळ्याने बांधावे
हातावर दोरा बांधण्याला कमी अर्थ उरावे
☆
बांधावी राखी कुणीही कुणाच्या ही हातावर
कुणी ही रक्षण करतो नातं मनातून जुळल्यावर
☆
स्व-संरक्षण करणे हेच असावे आपुले धेय्य
कुणी रक्षणास नाही, याचे नसावे कधीच भय
☆
मैत्रीला ही बंध हवेत मैत्री कायम निभावण्याचे
मैत्रीसोबत हसताना, प्रसंगी सोबत लढण्याचे
☆
नाती वेगवेगळी जरी, बंध प्रेमाने रक्षणाचे
सण हे केवळ निमित्तच कर्तव्ये आठवण्याचे
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈