श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– गुरू… –
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
ज्याला अभ्यास आवडी,
त्यास कौतुकाची गोडी !
जो काढेल खोडी,
त्याला हातावर छडी !
☆
चुकलात तर हक्काने,
करकचून कान पकडी !
चांगले शिक्षक म्हणजे,
जीवनाची खरी शिडी !
☆
विद्यार्थ्यांच्या यशात गुरुचे,
असते मोठे योगदान !
विद्यार्थ्यांचे यश बघून,
गुरुची उंचवते मान !
☆
शिक्षक आदराचे स्थान,
भागावी ज्ञानाची तहान !
भावी पिढीचा शिल्पकारच तो,
ज्ञानदानाचे कार्य करी महान !
☆
कृतज्ञतेचे भाव शिष्य,
गाती गुरुचे गुणगान !
धन्य गुरु धन्य शिष्य,
या परंपरेचा अभिमान !
☆
© श्री आशिष बिवलकर
05 सप्टेंबर 2023
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈