श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– दीड दिवसाचा बाप्पा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दीड दिवसाचा  बाप्पा,

झाले मूर्ती विसर्जन |

रिता पाट दिसे मखरात,

रुखरुखले माझे मन |

वर्षभर आतुरतेने वाट पहावी,

दीड दिवसाच्या उत्सवासाठी |

घराचे मंदिर होऊन जाई,

भक्तीभाव अंतरीच्या काठी |

स्थापना विसर्जन,

नावापुरतेच सोपस्कार |

चराचरात ईश्वरी तत्व,

मनी भाव तैसा आकार |

सण उत्सव सारे,

रुजवती धर्मबीजे मनात |

धार्मिक संस्कार,

शुद्ध आचरण जीवनात |

जैसे ऋतुचक्र चाले,

तैसी येती हिंदू सणवार |

अर्थचक्रही घेई गती,

पुढे चाले धंदा व्यापार |

धन्य हिंदू धर्म,

धन्य हिंदू संस्कृती |

सखोल विचार,

विश्व व्यापक स्विकृती |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments