चित्रकाव्य
बाप्पा निघाले गावाला… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆
☆
सुश्री नीलांबरी शिर्के
– बाप्पा निघाले गावाला… –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
( १ )
बाप्पा निघाले गावाला
मघे जोरात पाऊस आला
भिजायला लागले बाप्पा
काळजी पडली पोरांना
☆
निरागसतेने शर्ट काढला
बाप्पांभोवती गुंडाळला
भाबड्याने वर हातानेच
संरक्षक दिले गणेशाला
☆
गणेशही भाबडा निरागस
डोके काढून घेतो श्वास
तो पण रमून गेलाय जणू
अशा मिरवणुकीत खास
☆
बाप्पा काय ! बालमन काय !
सारं काही एकच असत
देवावरच्या श्रद्धेला नित
विश्वासाचं वरदान असतं
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
– बाप्पा निघाले गावाला… –
☆ श्री आशिष बिवलकर ☆
( २ )
कोसळणाऱ्या पावसाने नव्हे
भक्तिभावात चिमुकले ओलेचिंब |
काढून सदरा पांघरती बाप्पाला,
निरागस मनाचे उमटले प्रतिबिंब |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈