महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 145
☆ दहा दिवस गणपती… ☆
☆
दहा दिवस गणपती
माणसात येतो
माणसातले नखरे
मुकाट्याने पाहतो.!!
दहा दिवस गणपती
बंदिस्त होतो
ढोल ताशे बडबड
मोठया कानाने ऐकतो.!!
दहा दिवस गणपती
हतबल बनतो
दारुड्याचे नाचगाणे
मुकाट्याने साहतो .!!
दहा दिवस गणपती
प्रत्यक्ष दर्शी असतो
जुगार खेळणारे हात
तो कां नं रोखतो? .!!
दहा दिवस गणपती
गोड मोदक खातो
शेवटच्या दिवशी मात्र
जलसमाधी का घेतो.!!
दहा दिवस गणपती
वैतागून जातो
भक्तांचा भाव
निमूट सहन करतो.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈