श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
बकुळ ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
रंग पांढरा पिवळसर
तारकाकृती पाकळी,
जन्मजात हृदयी छिद्र
सडा पडे सांजवेळी !
☆
वृक्ष माझा घुमटाकार
घनदाट त्याची छाया,
कारागीर वापरती खोड
वर नक्षीकाम कराया !
☆
रस माझा येई कामा
सुगंध देण्या अत्तरास,
जखम बरी करण्या
साल येते उपयोगास !
☆
ओवून केळीच्या सोपात
गजरा माळती ललना,
कोणी रसिक ठेवीतसे,
मज पुस्तकांच्या पाना !
☆
आयुष्य थोड्या दिसांचे
सुकले तरी देते सुवास,
थोडावेळ ठेवता जलात
परत ताजी होते खास !
परत ताजी होते खास !
ब कु ळ !
☆
© प्रमोद वामन वर्तक
सिंगापूर, मो +६५८१७७५६१९
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈