श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “चालायचे तेजाकडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
आलो असे शून्यातूनी मी, चाललो शून्याकडे.
आलो जरी तिमिरातूनी मी, चाललो तेजाकडे.
☆
तिमिर शोषी तेज तेंव्हा, कृष्णविवरे उगवती.
कृष्णविवरे टाळूनी मी, चाललो तेजाकडे.
☆
तेजांध मी होईन तेव्हा दृष्टीपुढे फाके प्रभा.
तिमिर अन तेजांधता समजेल फरक तेजाकडे.
☆
आधीन देहाच्या जरी, आसक्ती देहाची नसे.
जायचे सोडून सारे, चालायचे तेजाकडे.
☆
अंतरे किती राहिली, का तयाची चिंता आता?
येईल जेव्हा हाक तेव्हा, चालायचे तेजाकडे.
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈