श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 🔨😜 ऑर्डर…ऑर्डर…ऑर्डर…! 😝😔 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
अनेकानेक ऑर्डर ऐकतच
होत असतो आपण मोठे,
ज्याचे आपल्याला जन्मभर
होत असतात फायदे तोटे !
☆
शिरसावंद्य बाबांची ऑर्डर
ऐकावी लागते आपल्याला,
आपला मूड नसतांना सुद्धा
बसावे लागते अभ्यासाला !
☆
कॉलेजमध्ये आऊटची ऑर्डर
आपण घेत नाही मनावर,
फायनलला करून अभ्यास
पास होतो कसेबसे काठावर !
☆
चांगल्या वाईट ऑर्डरींना
जातो नोकरीत सामोरे,
रीटायरमेंटपर्यंत मनांतून
विसरून जात असतो सारे !
☆
“अ हो ~~” ची गोड ऑर्डर
मिळते लग्नानंतर ऐकायला,
होता लग्नाला वीस एक वर्षे
गोडी “तिची” लागे लयाला !
☆
आणि वरची शेवटची ऑर्डर,
येत नाही कधी कुणा सांगून,
मनी “त्याच्या” आल्याबरोबर
तोच जातो आपणांस घेऊन !
तोच जातो आपणांस घेऊन !
☆
© प्रमोद वामन वर्तक
सध्या सिंगापूर 9892561086
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈