श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ फासे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
डोई निरभ्र आकाश
पायी चालाविशी वाट
वाटसरुची सोबत
संथ वारियाची लाट
ऊन पावसाचा खेळ
सत्य स्वप्नांचीही भेट
दु:खासवे सुखाची ही
असावीच वहिवाट
जरी वाटते कितीही
असो असे..नको तसे
उरे हातात आपुल्या
फक्त टाकायचे फासे…
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈