सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. माणसाला जसे शरीरिक आजार होतात तसे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात.पण या वैयक्तिक पातळीवर असल्याने लवकर दिसून येत नाहीत.
आपण मुलांच्या विषयी विचार करु. व काही छोट्या छोट्या गोष्टीं मधून मुलांचे आरोग्य लहानपणी पासूनच योग्य राखू या.
मुलांचे मानसिक आरोग्य मुलांना सुद्धा मानसिक ताण असतात.कोणत्या प्रकारचे ताण असतात बघू या.
लहान बाळाला काहीतरी करून दाखवायला लावणे .
बोलायला लावणे.
पाहुण्यांच्या समोर वस्तू दाखवायला लावणे.
वेगवेगळ्या कृती करायला लावणे.
बडबड गीते म्हणायला लावणे.
लहान वयातच शाळा,पालक,समाज त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा ठेवतात.
बरेचदा पालक दुसऱ्या मुलांच्या बरोबर तुलना करतात.
काही पालक सतत मुलांची काळजी करतात.
या मुळे मुलांवर ताण येतो.आपल्या साठी या सगळ्या सोप्या गोष्टी असल्या तरी मुलांच्या साठी मनावर ताण आणणाऱ्या परीक्षा असतात.काही मुले तर आईला काळजी वाटेल हा विचार सतत करतात आणि त्यातून स्वकेंद्री होतात.आपण एखादी गोष्ट केली तर आईला काय वाटेल या मानसिक दबावाखाली असतात.कधी घरात मतभेद असतील आणि मुलांच्या समोर भांडणे होत असतील तर मुले कोमेजून जातात.
मग अशी मुले अबोल होतात.सगळे येत असून व्यक्त होत नाहीत.आणि या गोष्टीची आई वडील जास्त काळजी करतात.असे एक वर्तुळ तयार होते.आपल्याला हेच वर्तुळ मोडायचे आहे.त्या साठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.त्या बघू या.
मुलांना रिलॅक्स व्हायला मदत करायची त्या साठी पुढील गोष्टी करु शकतो
१) चित्रे काढणे
२) चित्रे रंगवणे
३) डान्स करणे
४) व्यायाम करणे
५) मॉर्निग/इव्हिनिंग वॉक
६) त्यांच्याशी गप्पा मारणे
घरातील वातावरण
१) मुलांच्या समोर वाद करु नयेत
२) घरात एकमेकांशी सुसंवाद असावा.
३) सर्वांनी एक वेळेस तरी एकत्र जेवावे
४) जेवताना आनंदी विषय बोलावेत
५) घरात हास्य विनोद असावेत.
६) एकमेकांशी सुसंवाद असावा
मुलांना ताणा मधून बाहेर कसे यायचे ते शिकवणे
१) हे शिकवणे न कळत व्हायला हवे.
२) त्या साठी कोणतीही गोष्ट मुलांनी प्रथम घरात सांगण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा.
३) मुलांशी मोकळे पणाने संवाद साधावा.
४) कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास त्यांना द्यायला हवा.
अभ्यास विषयक मानसिकता बदलणे
१) मोठ्या माणसांनी टीव्ही,मोबाईल किंवा अन्य गोष्टी बघत “तू अभ्यास कर” असे मुलांना सांगणे टाळावे.
२) आपण अभ्यास करु असे म्हणावे.
३) अभ्यासातून मधे ब्रेक द्यावा.थोडा वेळ खेळू द्यावे किंवा आवडीची गोष्ट करु द्यावी.
मुलांना मोकळे पणाने बोलण्याची संधी द्यावी.
म्हणजे ते त्यांच्या भावना विचार व्यक्त करु शकतील.व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
मुलांप्रती प्रेम व्यक्त करणे
प्रेम तुमच्या मुलांना कधीच बिघडवत नसते तर त्यांना चांगल माणूस होण्यास मदत करते. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर ते मुलाला दाखवा. त्याच्यासमोर ते व्यक्त करा. जेणेकरून तुमच्या मुलांना हे समजेल आणि पुढे जाऊन याची त्याला जाणीव होईल. आपल्या मुलावर प्रेम करणे, त्याला मिठी मारणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि दररोज त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकणे इतके सोपे असू शकते. यामुळे मुलांच्या शरीरात ऑक्सिटोसिनसारखे फील-गुड हार्मोन्स वाढतात आणि यामुळे त्यांना आनंदी आणि सकारात्मक माणूस बनण्यास मदत होते.
मुलांना समाजिक राहण्यास मदत करणे
मुलांच्या मानसिक विकासासाठी तुम्ही त्यांना सामाजिक राहण्यास सांगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांची लोकांशी ओळख करून द्या आणि त्यांच्याशी बोलायला शिकवा. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने वागायला शिकवा. तसेच त्यांना बाहेरची कामे करू द्या. यामुळे ते बाहेरील लोकांशी मोकळेपणाने वागायला शिकतील आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अशा प्रकारे ते सामाजिकदृष्ट्या मजबूत बनतील.
त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या
मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवू द्या.
यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीला स्वतःहून सामोरे जाण्यास शिकवा. याचा सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळेल.
यानंतर त्यांच्यासमोर कोणतीही समस्या आली तर ते मानसिक आजारी होणार नाहीत, तर समस्या समजून घेऊन त्याशी लढा देतील.
मुलांना शॉपिंगला न्यावे
हे सध्या बऱ्याच घरात होते.पण जे करत नसतील त्यांनी जरुर सुरुवात करावी.मोठ्यांच्या किंवा घरातील वस्तू घेताना सुद्धा त्यांचे मत विचारावे.
अशा काही गोष्टी करुन मुलांमधील आत्मविश्वास वाढवू.व त्यांना मानसिक सशक्त होण्यास मदत करु.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈