श्री राहूल लाळे
विविधा
☆ अमिताभ….’शहेनशहांचा शहेनशहा’… ☆ श्री राहूल लाळे ☆
हा ‘शहेनशाह’, ‘दि ग्रेट गॅंबलर’, ‘खुद्दार’, ‘देशप्रेमी’ च नाही ‘महान’ नायक आहे, जो ‘कभी-कभी’ ‘मजबूर’ ‘एकलव्य’ ही होता. ‘अग्निपथ’ वर हा ‘आज का अर्जुन’ बनून या ‘नमक हलाल’ ने ‘गंगा की सौगंध’ घेत ‘नि:शब्द’ ‘आखिरी रास्ता’ पार पाडत ‘मुकद्दर का सिकंदर’ बनला. याच्या ‘नसीब’ ने या ‘अजूबे’, ‘जादूगर’ ला कधी ‘डॉन’ बनवून ‘जंजीर’ मध्ये ‘गिरफ्तार’ केलं तर कधी ‘शराबी’ समजून ‘जुर्माना’ लावत ‘अंधा कानून’ च्या ‘खाकी’ वर्दीच्या हवाली केलं. आयुष्यात कितीही चढ उतार झाले तरी ‘कभी खुशी कभी गम’ ची ‘दीवार’ या ‘मर्द’ माणसाच्या ‘जमीर’ च्या ‘शान’ ला ‘ब्लॅक’ करू शकली नाही. या ‘कालिया’ च्या यशाचा ‘सिलसिला’ ‘सात हिंदुस्तानी, ‘अजूबा ‘, ‘अमर अकबर अँथनी ’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘बॉम्बे टू गोवा’ पर्यंत अजूनही गायला जातो.
‘आनंद’ ने ‘खून-पसीना’ गाळला नसता तर तो ‘अकेला’ ‘हेरा-फेरी’ करून सुद्धा ‘कुली’ च्या पुढं पाऊल टाकू शकला नसता, पण हा ‘लावारिस’ ‘रेश्मा और शेरा’ बनून ‘वक्त’ च्या ‘कसौटी’ ला खरा उतरून त्याच्या ‘मंजिल’ पर्यंत पोचला आणि ‘हम’ सारे बोललो ‘गॉड तुसी ग्रेट हो’
रामगोपालच्या ‘आग ‘ चे ‘शोले ‘ आणि त्यातला ‘बदला ‘ विसरून तो ‘पिकू’ चा ‘पा’ बनला. ‘एक अजनबी’ मधला अंगरक्षक ‘आँखे ‘ करारी ठेवत ‘पिंक ‘ मध्ये काळा डगला चढवून ‘गहरी चाल’ खेळला.
एवढा ‘तुफान ‘ गाजावाजा होत असताना ‘चुपके चुपके ‘ चा ‘याराना ‘ ‘दोस्ताना ‘ याला ‘राम बलराम’ पर्यंत आणि ‘लावारिस ‘ ‘लाल बादशाह’ ला ‘खुदा गवाह ‘ आहे ‘सूर्यवंशम’ पर्यंत घेऊन गेला.
‘त्रिशूल*धारी हा ‘देशप्रेमी’ कधी ‘मि नटवरलाल ‘ च्या खोड्या करत ‘ ठग ऑफ हिंदुस्तान’ झाला . आईचा ‘सुहाग ‘जपत ‘काला पथ्थर ‘ फोडून लोकांच्या ‘रोटी कपडा और मकान ‘ साठी लढला. . ‘बरसात कि एक रात ‘ मधल्या पावसासोबत या *’बागबान’ ने ‘ मोहोब्बते ‘ ने रसिकांच्या मनात प्रेमाच्या बागा फुलवल्या.
अजब हा ‘भूतनाथ’ ‘बडे मियाँ ‘ ‘छोटे मियाँ ‘ च्या *झुंड मध्ये ‘ करोडपती’ करत ‘शहेनशहांचा शहेनशहा’ बनला…आणि एवढं सगळं करुन *बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणायला हा तयारच
दादासाहेब फाळके अवॉर्ड विजेत्या महानायक ” फॉरेव्हर अँग्री यंग मॅन शहेनशाहोंके शहेनशाह अमिताभ बच्चनला ‘ वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!
© श्री राहुल लाळे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈