श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ विचार लेखणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
अविचारी माणसे सध्या मी टाळतो आहे
तत्वांचीया अभ्यास ग्रंथे मी चाळतो आहे.
☆
प्रत्यक्षात डोळ्यादिक्कतंचे अपराध
चिंतनात भविष्ये नित्य माळतो आहे.
☆
हिंसाचक्र,नराधम पापात नाचती
मनालाच लेखणीत सांभाळतो आहे.
☆
वृत्ती माझी हळव्यात डरपोक जरी
मानवी हक्कासाठी धैर्यास भाळतो आहे.
☆
शस्त्रावीन पार संयमाचे अस्त्र टोकाचे
तेच सत्य शब्दज्वाळा कुरवाळतो आहे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈