श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “देह उमगला” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
एकांत शांत मंद वात देह उमलला
तू निवांत मी निवांत देह उमगला
या निर्मळ एकांती
मूक शब्द मनशांती
देहातुन जाणिवेत भाव उमटला
अपरिचित ना दोघेही
भाव नवा आज तरी
देहाच्या बोलीतुन शब्द उमटला
शब्दाला स्वर नाही
याला व्यंजन नाही
शब्द उमटण्यासाठी आत दाटला
मूक शब्द हा कसला
मौनातच अडखळला
व्यक्त होण्याआधी अंतरीच मिटला
मिटता मिटता कांही
तो सांगुन गेला देही
रोमांचांना देही फुलवुनी उठला
देहामधुनी देही
जाणवला तुज काही
की विश्व व्यापुनी तो मनोमनी मिटला.
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈