श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– थोरवी…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
महामानवाची ! स्मरावी महती !
श्रद्धेने वंदती ! थोरपण !!१!!
☆
बुद्धिचे सामर्थ्य ! कुळे उद्धरती !
स्वप्न साकारती ! बंधूतेचे !!२!!
☆
विचारांचे तेज ! दिले संविधान !
उंचावली मान ! भारताची !!३!!
☆
अखंडित कार्य ! केली राष्ट्रसेवा !
विचारांचा ठेवा ! अनमोल !!४!!
☆
शिक्षा संघटन ! संघर्ष त्रिसूत्री !
विचार स्वतंत्र ! शिकवण !!५!!
☆
ज्ञानाचा प्रकाश ! सारीला तिमिर !
वंचितांना धीर । तुम्हापायी !!६!!
☆
आशिष जाणितो ! तेजाची थोरवी !
जैसे चंद्र रवी ! निरंतर !!७!!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈